पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा

सरली निशा हसली उषा आनंदल्या दाही दिशा सरली निशा हसली उषा आनंदल्या दाही दिशा देणगी मिळाली मानवा उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। धृ ।। धन्य ती माता भिमाई पोटी आला रामाचा लाल चौदा एप्रिल या दिनी समतेचा झाला उष:काल धन्य ती माता भिमाई पोटी आला रामाचा लाल चौदा एप्रिल या दिनी समतेचा झाला उष:काल रखरखत्या उन्हामध्ये एक्यानव सनामध्ये रखरखत्या उन्हामध्ये एक्यानव सनामध्ये चैतामध्ये गारवा उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। १ ।। भारत भूमीचा सुपुत्र जन्माला या मंगल दिनी फुलोरा फुलिनी आला दलितांच्या घरी अंगणी भारत भूमीचा सुपुत्र जन्माला या मंगल दिनी फुलोरा फुलिनी आला दलितांच्या घरी अंगणी निळ्या नभी निळा नवा लाखांमध्ये एक दिवा निळ्या नभी निळा नवा लाखांमध्ये एक दिवा शीतल जणू चांदवा उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। २ ।। महू गाव सारे नाचले उधळीत सप्तरंग हर्षाने भरुनी आले दुबळ्यांचे अंतरंग महू गाव सारे नाचले उधळीत सप्तरंग हर्षाने भरुनी आले दुबळ्यांचे अंतरंग धन्य धन्य हा जन्म सार्थक हे दीपश्याम धन्य धन्य हा जन्म सार्थ...

पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी

पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।।धृ ।। पाण्यासाठी हे जीव तळमति जीव जीवाला का हे छळती पाण्यासाठी हे जीव तळमति जीव जीवाला का हे छळती स्पर्श करुनि हे पाणी पिणार आहे मी समान हक्क मानवाला देणार आहे मी पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। १ ।। पाणी निसर्गाची देणगी हि माणूस माणसा का पाण्यात पाही पाणी निसर्गाची देणगी हि माणूस माणसा का पाण्यात पाही नाते एक जीवांचे जोडणार आहे मी सत्यासाठी या जागी लढणार आहे मी पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। २ ।। सत्याग्रह चा चवदार तळ्याचा मानवी हक्काचा हा सत्याचा सत्याग्रह चा चवदार तळ्याचा मानवी हक्काचा हा सत्याचा दृष्ट रूढीवर तुटुनी पडणार आहे मी परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। ३ ।। पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी   

श्रम माझे बाळांनो आठवूनी

श्रम माझे बाळांनो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनि प्रचाराचे रान हे  उठवुनी हो हो होहो प्रचाराचे रान हे उठवुनी बुद्धाचा धम्म द्या पटवूनि श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। धृ ।। हा राग द्वेष मोह माया नको अविचार असा हा मुळीच नको प्रज्ञा शील करुणा आचरणी पाप कर्म अनीती मुळीच नको त्रिशरण आणि ती पंचशीला हो हो हो हो हो त्रिशरण आणि ती पंचशीला अष्टांगिक मार्ग  तो आचारुनी श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। १ ।। धर्म जाती भेद मुळीच नको माणसा माणसात हा वाद नको रक्तपात नको घातपात नको मानवाच्या जिव्हारी  आघात नको रक्ताची हि नाती जुळवुनी हो हो हो हो हो हो रक्ताची हि नाती जुळवुनी विषमतेला  त्या कटवुनी श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। २ ।। मानवता खंगलीभ्रांतीने जे दिले ते आठवा मातीने बुद्धाच्या सम्यक क्रांतीने क्रांती हि घडवा शांतीने जगू या रे सारे प्रेमाने हो हो हो हो  हो हो हो जगू या रे सारे प्रेमाने प्रभाकरा भारत नटवूनि श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। ३ ।। संघटना एकीने साधावी ममतेने तुम्ही ती बांधावी बोधिवृक्ष फुलू द्या हि पालवी सुख शांती जीवनी लाभावी बुद्ध कबीर  फुले...

कायदा भीमाचा

कायदा भीमाचा फोटो गांधींचा कायदा भीमाचा फोटो गांधींचा शोभून दिसतो का नोटांवर शोभून दिसतो का नोटांवर किती शोभला असता भीम नोटांवर टाय अन कोटावर  किती शोभला असता भीम नोटांवर टाय अन कोटावर ।। धृ ।। खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार विद्येलाही पुरून उरला असा विद्याधर खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार विद्येलाही पुरून उरला असा विद्याधर देशा सावरलं त्या गांधीला  तारलं पेनाच्या त्या टोकावर  किती शोभला असता भीम नोटांवर टाय अन कोटावर ।। १।। राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते त्यात एक महान माझे भीमराव नेते राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते त्यात एक महान माझे भीमराव नेते ना कधीच हरले मागे न सरले केला इशारा त्या बोटावर  किती शोभला असता भीम नोटांवर टाय अन कोटावर ।। २ ।। सत्यहीत सर्वांचे भीमानेच पाहिले म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले सत्यहीत सर्वांचे भीमानेच पाहिले म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले मित्तल अंबानी ऋणी भीमाचे थोर उपकार टाटावर किती शोभला असता भीम नोटांवर टाय अन कोटावर ।। ३ ।। कोटी कोटी या दीनांचा भीम वाली ठरला बहुजनांच्या  हितासाठी देशोदेश...

माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा

अशिक्षित  जरूर मी लेखू नको मज कमी  अशिक्षित  जरूर मी लेखू नको मज कमी  परिचय स्वःताच देते परिचय स्वतःचा माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा  ।। धृ ।। प्रतिव्रतेचा दाखला माझा या जन्मीचा सोबती राजा धनी मला साजतो दाही दिशा गाजतो धनी मला साजतो दाही दिशा गाजतो  डंका तो कीर्तीचा त्याच्या डंका तो कीर्तीचा माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा  ।। १ ।। या देशाचा नेक हा नेता बौद्ध जनांचा जीवनदाता फिरतो आज मानवा ज्ञानाचा देवन दिवा फिरतो आज मानवा ज्ञानाचा देवन दिवा मार्ग नव हिताचा तो मार्ग नव हिताचा माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा  ।। २ ।। या पोलादी झुंजाराची आहे मी पत्नी धुरंधराची ना कुणी या सारखा जनहिताचा म्होरका ना कुणी या सारखा जनहिताचा म्होरका सारथी रथाचा तो सारथी रथाचा माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा  ।। ३ ।। अशिक्षित  जरूर मी लेखू नको मज कमी  अशिक्षित  जरूर मी लेखू नको मज कमी  परिचय स्वःताच देते परिचय स्वतःचा माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा माझं नाव हाय रमाई धन...

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

वदे रमाई साजन बाई ग काय सांगू ती नवलाई मन गहिरवलं फुलून बहरलं मन गहिरवलं फुलून बहरलं  पतुर आलाय आज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं गुणी गुणांचा राज दिनाचा थाटण्या संसार साज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। धृ ।। गोड गोड हि कानी पडली सुमधुर ग वाणी धान्य जाहले ऐकून सार त्या राजाची राणी गोड गोड हि कानी पडली सुमधुर ग वाणी धान्य जाहले ऐकून सार त्या राजाची राणी  साकार झालं फळाला आलं सपान वैभव ताज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। १ ।। दुभळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी त्या  बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी दुभळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी त्या  बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी मनी ग स्पुर्ती पाहून कीर्ती मन हे मनात लाज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। २ ।। आई अशी मी  कोटी जणांची नशीब माझं थोर ग त्या घरट्यात पाजीन पाणी हि मायेची धार ग आई अशी मी  कोटी जणांची नशीब माझं थोर ग त्या घरट्यात पाजीन पाणी हि मायेची धार ग दुःखितांचा शोषितांचा शिरी वाहण्या ओझं येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। ३ ।। कुंकू भा...

मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात

भल्या माणसा अंधरूढीच्या का गुदमरशी धुरात मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। धृ ।। तू क्रित्येक वाऱ्या केल्या होऊनिया वारकरी समाधान सुख शांती रे तुला मिळणार नाही तरी तू क्रित्येक वाऱ्या केल्या होऊनिया वारकरी समाधान सुख शांती रे तुला मिळणार नाही तरी घातक ऎस्या जीव घेणाऱ्या वाहू नको तू पुरात मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। १ ।। धम्म बुद्धाचा स्वीकारता जीवनाला येई गती सोड अंधश्रद्धेचा छंद अरे होईल तुझी भ्रमंती  धम्म बुद्धाचा स्वीकारता जीवनाला येई गती सोड अंधश्रद्धेचा छंद अरे होईल तुझी भ्रमंती  शुद्ध करावे आपले तनमन राहू नको त्या भ्रमात मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। २ ।। परिवर्तन भीमाने केले मग केले हे धर्मांतर त्या दीक्षाभूमीवर शुद्ध होईल रे अंतर  परिवर्तन भीमाने केले मग केले हे धर्मांतर त्या दीक्षाभूमीवर शुद्ध होईल रे अंतर  कुचकामी त्या जीर्ण विचारा नको साठवू उरात मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। ३ ।। येणाऱ्या संकटावरी जोमानं करावी मात त्यागुनी त...

माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई

राम नाम घेई कुणी हरी नाम घेई राम नाम घेई कुणी हरी नाम घेई  माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। धृ ।। कोंबड्याचीबांग येता क्षणी मी उठाव न्हान धून झाल्यावर विहारात जावं कोंबड्याचीबांग येता क्षणी मी उठाव न्हान धून झाल्यावर विहारात जावं न्हान धून झाल्यावर विहारात जावं धरत्रीच्या निरवतेच धरत्रीच्या निरवतेच झुंजू मुंजु होई माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। १ ।। रून झुन घुंगराची गळी चित्रबांच्या रेखा कधी नक्षी नभी रांगा पाखरांच्या रून झुन घुंगराची गळी चित्रबांच्या रेखा कधी नक्षी नभी रांगा पाखरांच्या रेखा कधी नक्षी नभी रांगा पाखरांच्या वासराच्या साठी जेव्हा वासराच्या साठी जेव्हा  हंबरती गायी माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। २ ।। कासराभर सूर्य येत शेताला मी जाते थकून भागून जेव्हा सांजला मी येते कासराभर सूर्य येत शेताला मी जाते थकून भागून जेव्हा सांजला मी येते थकून भागून जेव्हा सांजला मी येते  बुद्ध वंदनेने माझा बुद्ध वंदनेने माझा क्षीण भाग जाई माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। ३ ।। अशी गोड गोड भीम गौतमाची गाणी जीव तृप्त करी जण...

त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर

नागांच्या त्या नागपुरात चंद्रमणी सवे लाखो जनात त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। धृ ।। मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हो झाला लाखो जणांचा दलित मेळा बुद्धचरणी नेला मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हो झाला लाखो जणांचा दलित मेळा बुद्धचरणी नेला छप्पन झाली हर्ष भरात चंद्रमणी सवे लाखो जनात त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। १ ।। येवले ठायी गर्जना केली भीमानं धर्मांतराची उजाडली ती रम्य पहाट दलित दिक्षांतराची येवले ठायी गर्जना केली भीमानं धर्मांतराची उजाडली ती रम्य पहाट दलित दिक्षांतराची बुद्धाची वाणी गावुन मुखात चंद्रमणी सवे लाखो जनात त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। २ ।। अशोकानंतर फिरविले ते चक्र त्याने धम्माचे बुद्धंन सरणं मंत्र गायीला दर्शन दिले बुद्धाचे अशोकानंतर फिरविले ते चक्र त्याने धम्माचे बुद्धंन सरणं मंत्र गायीला दर्शन दिले बुद्धाचे सोन लुटलंय घराघरात चंद्रमणी सवे लाखो जनात त्या दीक्षा भूमीवर भीमानं केलय धर्मांतर ।। ३ ।। नागपुरात या जीवनाचं सार्थक झालं माझं बुद्धचरणी लिन झाले हर्षदा दिलराज नागपुरात या जीवनाचं सार्थक झालं माझं बुद्...

कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा

गुलामीचे  तोडूनबंधन दलितांना दिधले  जीवन गुलामीचे तोडून बंधन दलितांना दिधले जीवन लाभला या दिन दुभल्याना पुढारी खरा कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। धृ  ।। अन्याय आणि अत्याचार जिकडे तिकडे होता फार अन्याय आणि अत्याचार जिकडे तिकडे होता फार  अन्याय हटविण्याला अत्याचार  मिटविण्याला अन्याय हटविण्याला अत्याचार  मिटविण्याला  खांदयावरती दिन जणांची वाहिली धुरा कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। १ ।। चंदनापरी तो देह झिजवला धन द्रव्याचा मोह नाही केला चंदनापरी तो देह झिजवला धन द्रव्याचा मोह नाही केला  विद्वान ते धनवान तया बोलती मानानं विद्वान ते धनवान तया बोलती मानानं   नवकोटी जनतेचा तो मानाचा तुरा कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। २ ।। त्या कणाकणातून मातीच्या कणांचे सोने केले मानवाच्या मनाचे त्या कणाकणातून मातीच्या कणांचे सोने केले मानवाच्या मनाचे माणुसकी ती शिकवून माणसाला माणूस म्हणून माणुसकी ती शिकवून माणसाला माणूस म्हणून   धम्म बुद्धाचा तो दिधला मायेचा झरा कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। ३ ।। भारत भूमीला भीमराय...

भीम जन्माला

उद्धराया ताराया दुःख दूर साराया कैवारी या जना लाभला बाळ जन्माला तो भीम जन्माला बाळ जन्माला तो भीम जन्माला ।। धृ ।। रत्न चौदावे जेव्हा  आले जन्मा ते धन्य झाली भिमाई रामजी पिता ते रत्न चौदावे जेव्हा  आले जन्मा ते धन्य झाली भिमाई रामजी पिता ते असा दिन सोन्याचा वाली आला दीनांचा असा दिन सोन्याचा वाली दीनांचा घरोघरी दीप लागला बाळ जन्माला तो भीम जन्माला बाळ जन्माला तो भीम जन्माला ।। १  ।। आंधळ्या त्या जीर्ण अस्या रुढीला पाहून काळासाठी आला तो काळ होऊन आंधळ्या त्या जीर्ण अस्या रुढीला पाहून काळासाठी आला तो काळ होऊन फुलली सारी धरणी हि मानवाच्या जीवनी दुबळा समाज जागला बाळ जन्माला तो भीम जन्माला बाळ जन्माला तो भीम जन्माला ।। २ ।। चहूगावी प्रकाशीला दीप समतेचा झाला भीमाईच्या पोटी उदय ममतेचा चहूगावी प्रकाशीला दीप समतेचा झाला भीमाईच्या पोटी उदय ममतेचा दिव्य जीवनी तारा दिन जणांचा प्यारा भारताला पुत्र साजला बाळ जन्माला तो भीम जन्माला बाळ जन्माला तो भीम जन्माला ।। ३ ।। आदर्शान उत्कर्षा पसरली प्रभात स्वरांजली आनंदली तारक नभात आदर्शान उत्कर्षा पसरली प्रभात स्वर...

बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना

युग पुरुषा हे महामानवा युग पुरुषा हे महामानवा युग पुरुषा हे महामानवाभारत भू नंदना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना  ।। धृ ।। हीन अवकळा ती संपली समतेची बाग फुलली गुलामीची बेडी तोडली प्रेमाची नाती जोडली झिजला खपला या देशास्तव झिजला खपला या देशास्तव साहुनी या यातना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना  ।। १ ।। प्रज्ञा शील आणि करुणा मानवास देई प्रेरणा अष्टांगिक मार्ग या जना प्रफुल्लित करी जीवना बुद्ध कबीर फुल्यांचे कर्म बुद्ध कबीर  फुल्यांचे कर्म लाजवी या चंदना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना  ।। २ ।। आदर्श धम्म पल्लवी राग द्वेष मोह भुलवी विजया आनंदाची थोरवी हर्षदा उत्कर्ष डोलावी प्रभाकरा तो गीत गुंफा प्रभाकरा ती गीत गुंफा वाहुनी या  सुमना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना  ।। ३ ।। युग पुरुषा हे महामानवा युग पुरुषा हे महामानवा युग पुरुषा हे महामानवाभारत भू नंदना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना  ।। धृ ।।

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा

गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। धृ ।। कानाची कवाडे इथली उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही कानाची कवाडे इथली  उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आघाडीवर होता जरी नवकोटीचं राजा आघाडीवर होता जरी नवकोटीचं राजा  उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। १ ।। माणसास पाणी पाजा माणसास पाणी निनादत होती सारी भीमाची हि वाणी माणसास पाणी पाजा माणसास पाणी निनादत होती सारी भीमाची हि वाणी निनादत होती सारी भीमाची हि वाणी इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा  उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। २।। दार उघड रामा आता दार  उघड रामा पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा दार उघड रामा आता दार उघड रामा पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा दर्शनाची संधी भीम मागत होता माझा दर्शनाची संधी भीम मागत होता माझा उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। ३ ।। राम दाखवारे तुमचा राम द...

मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर

भारताचे काळजी भीम भारताचे काळीज भीम जगाच्या ओठावर जगाच्या ओठावर मग पाहिजे कशाला बा भीमा मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर  ।। धृ ।। कुंटणखाना बियर बार ते दलालांच्या हातात दलालांच्या हातात रोजच्याच घोटाळात  नोट विकली जातात नोट विकली जातात खुशाल असू द्या नोटेवर त्या गांधीला खुशाल असू द्या नोटेवर त्या गांधीला बंधनात बांधू नका भीम सूर्य आंधीला बंधनात बांधू नका भीम सूर्य आंधीला नाव भीमाचे नाव भीमाचे तरतंय आहे सागर लाटांवर सागर लाटांवर मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर  ।। १ ।। दिल दान भीमानं हे संविधान देशाला बाई बाई संविधान देशाला अशोक चक्र देणारे आम्ही भीक मागू कशाला बाई बाई भीम मागू कशाला जगातील विद्वानांत भीमराव एक जगातील विद्वानांत भीमराव एक स्वयंघोषित महात्म्याला भीमरावांचा धाक या देशाची या देशाची दिशा हजारे ठरवली बोटावर ठरवली बोटावर मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर  ।। २ ।।   त्या मोक्याच्या जागा आधी काबीज करू चला रे गौतमाच्या सावलीची वाट धरू चला रे कशाला गल्ली चौकाला नाव डझनभर कशाला गल्ली चौकाला नाव डझनभर कशाला ग...

दिनकरा हि फुलली हि वसुंधरा

विश्वरत्न ज्ञान सागरा विश्वरत्न ज्ञान सागरा ज्ञान सागरा आ आ दिनकरा फुलली हि वसुंधरा दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। धृ।। विश्वरत्न ज्ञान सागरा विश्वरत्न ज्ञान सागरा ज्ञान सागरा आ आ दिनकरा फुलली हि वसुंधरा दिनकरा हि फुलली हि वसुंधरा  ।। धृ ।। जीवन वेली ती सुकलेली जीवनवेली ती सुकलेली त्या वेलीला फुले हि फुलली ऋतू वसंत तू खरा ऋतू वसंत तू खरा वसंत तू खरा दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। १ ।। अंधारमय हे जीवन होते अंधारमय हे जीवन होते दूरदृष्टीचे बंधन होते चमकला तो कोहिनुर हिरा चमकला तो कोहिनुर हिरा कोहिनुर हिरा दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। २ ।। दिला आधार या कोटी लेकरा दिला आधार या कोटी लेकरा निराधार या दुःखी पाखरा बोधिसत्व मायेचा झरा बोधिसत्व मायेचा झाला मायेचा झरा दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। ३ ।। हृदयी तुझा हा आहे आदर्श हृदयी तुझा हा आहे आदर्श उत्तम होतो आज उत्कर्ष जयभीम मानाचा तुरा जयभीम मानाचा तुरा मानाचा तुरा दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। ४ ।। विश्वरत्न ज्ञान सागरा विश्वरत्न ज्ञान सागरा ज्ञान सागरा आ आ दिनकरा फुलली हि वसुंधरा दिनकरा हि फुलली हि वसुं...

आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी

युद्ध नको हे हे हे युद्ध नको हवा बुद्ध आम्हाला म्हणतेय हि दुनिया सारी आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। धृ ।। नको नको हा रक्तपात शस्त्रांचा आलाय वीट हा विजय मानवतेचा करुणेची उगवली पहाट सत्य अहिंसा शांतीचा या सत्य अहिंसा शांतीचा या  बनलाय जो तू पुजारी आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। १ ।। नको दास रूढींचे राहू नका आंधळी श्रद्धा ठेवू या आपुल्या स्वार्थासाठी नका बळी कुणाचा देऊ निर्मल जीवन जगण्यासाठी निर्मल जीवन जगण्यासाठी पंचशीला हि आचारी आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। २ ।। नका तुच्छ कुणाला लेखू समतेची फळे या चाखू बुद्ध विज्ञानाचा पाया चला पुढचे पाऊल टाकू घालू गवसणी आकाशाला घालू गवसणी आकाशाला घेऊ या उंच भरारी आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। ३ ।। नको अहंकार अंगार सरणार उद्या अंधार फुलवुया प्रेम दरबार तू तुझाच शिल्पकार जागा आणि दुसऱ्याला जगवा जागा आणि दुसऱ्याला जगवा कुंदन या संसारी आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। ४ ।। युद्ध नको हे हे हे युद्ध नको हवा बुद्ध आम्हाला म्हणतेय हि दुनिय...

पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी

पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी साधून घे संधी तुझ्या या जीवनामधी साधून घे संधी तुझ्या या जीवनामधी  पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। धृ ।। जीवहिंसा ती नको चोरी करणे ते नको अनाचार तो नको खोटे बोलणे नको नशिली नशा नको चुकीची दिशा नको उगा तमाशा नको पदरी निराशा नको कुठे  तू आहे तुला शोधी राहू नको धुंदी मधी पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। १ ।।  मनात घोळ नको फिरू गोलगोल नको बुडशील डोहामधी जाऊ तू खोल नको चंचल वागणे हे खोटा डामडौल नको संयम राख सदा ढळू देऊ तोल नको ठरतील सर्व तुझ्या व्याधी राहू नको धुंदीमधी पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। २ ।। आचरण कर शुद्ध मानाने हो शुद्ध होशील तेव्हा तू सम्यक संबुद्ध देव मनि जिद्द नको राहू निर्बुद्ध कुंदन धम्माचा लुटू ये आनंद जीवनी होशील ल सुगंधी राहू नको धुंदीमधी पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। ३।। पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी

बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले

नागांच्या नगरीत लाखो जनाला छप्पन झाली मनामनाला नागांच्या नगरीतलाखो जनाला छप्पन झाली मनामनाला दिशा वेगळी डाऊन भीमानं दिशा वेगळी डाऊन भीमानं  दूध धम्माच पाजवल दूध धम्माच पाजवल बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। धृ ।। मला आवडला म्हणून  खरोखर वदला भीम घ्या पटला तर मला आवडला म्हणून  खरोखर वदला भीम घ्या पटला तर विचार करुनि तेव्हा स्वीकारा विचार करुनि तेव्हा स्वीकारा काहूर बुद्धीच माजवलं काहूर बुद्धीच माजवलं बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। १ ।। माझ्या भीमाची न्यारीच बात क्रांती घडविली नसानसात माझ्या भीमाची न्यारीच बात क्रांती घडविली नसानसात चंद्रमणीच्या मंगल हस्ते चंद्रमणीच्या मंगल हस्ते धम्म सोहळ्याला साजवल बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। २ ।। करून अभ्यास अतिश्रमानं अशोकांनंतर माझ्या भीमानं करून अभ्यास अति श्रमानं अशोकांनंतर माझ्या भीमान धम्मचक्र ते फ़िरवुनी या धम्मचक्र ते फ़िरवुनी या नाव जगी या गाजवलं बौ...

हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही

ताट मानेने सदाच जगला ताट मानेने सदाच जगला तोल हि ढळला नाही हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। धृ ।। यांनी केवळ जय जयकारा घसा फाडला आपला आणि पहा तर दगडा खाली हात काढला आपला यांनी केवळ जय जयकारा घसा फाडला आपला आणि पहा तर दगडा खाली हात काढला आपला तो  तर आपल्या कार्यासाठी तो  तर आपल्या कार्यासाठी  कधी हि ढळला नाही हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। १ ।। कैक होऊन नेते आपल्या टोळ्या घेऊन फिरती याना कितीतरी दारोदारी झोळ्या घेऊन फिरती कैक होऊन नेते आपल्या टोळ्या घेऊन फिरती याना कितीतरी दारोदारी झोळ्या घेऊन फिरती पण भिक्षेसाठी भीम कुणाच्या पण भिक्षेसाठी भीम कुणाच्या   दारी वळला नाही हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। २ ।। स्वाभिमानाची जपण्याची यांना काळजी कुठली हाजीहाजी  ती करण्याची लाज जणू का सुटली स्वाभिमानाची जपण्याची यांना काळजी कुठली हाजीहाजी  ती करण्याची लाज जणू का सुटली एकेमकांवर यातील सांगा ...

नागपुरात भीमरायाने सोन वाटले

नागपुरात भीमरायाने सोन वाटले नागपुरात भीमरायाने सोन वाटले समाजाचे पारन फिटलं  हो हो समाजाचे पारन फिटलं ।। धृ ।। सद्धम्माचा असली सोन सद्धम्माचा असली सोन  पारखल हो बाबा भीमाने पारखल हो बाबा भीमाने  तथागताचे गौतमाचे दान भेटले तथागताचे गौतमाचे दान भेटले समाजाचे पारन फिटलं  हो हो समाजाचे पारन फिटलं ।। १ ।। भीमज्ञानात अचाट शक्ती भीमज्ञानात अचाट शक्ती  त्या शक्तीने आली युक्ती त्या शक्तीने आली युक्ती  मालामाल केलं त्यानं कोटी खटल मालामाल केलं त्यानं कोटी खटल समाजाचे पारन फिटलं  हो हो समाजाचे पारन फिटलं ।। २ ।। भयभीत मन हे निर्भय झाले भयभीत मन हे निर्भय झाले  ताट मानेने जो तो चाले ताट मानेने जो तो चाले  बहुजनाने त्या दिल्लीचे दार गाठलं बहुजनाने त्या दिल्लीचे दार गाठलं समाजाचे पारन फिटलं  हो हो समाजाचे पारन फिटलं ।। ३ ।।  मेरुमणी विद्येचा ताईत  मेरुमणी विद्येचा ताईत  दिसेना सुखलाला ऐसा पटाईत दिसेना सुखलाला ऐसा पटाईत  लाजवील कुबेराला नवल वाटलं लाजवील कुबेराला नवल वाटलं  समाजाचे पारन फिटलं...

मी जगेल तर या समाज्यासाठी

मी जगेल तर या समाज्यासाठी मी जगेल तर या समाज्यासाठी मी मरेल तर या समाज्यासाठी ।। धृ ।। एकोणीसशे सत्तावीस साली आंबेडकरांच्या मुखी भाषा एकोणीसशे सत्तावीस साली आंबेडकरांच्या मुखी भाषा घेतले दलितांना माझ्या ओटी घेतले दलितांना माझ्या ओटी मी जगेल तर या समाज्यासाठी मी जगेल तर या समाज्यासाठी मी मरेल तर या समाज्यासाठी ।। १ ।। नको पैसा नको धनमान ते दीना साठी करील जीवाचे रान ते तुम्ही रहावे फक्त माझ्या पाठी तुम्ही रहावे फक्त माझ्या पाठी मी जगेल तर या समाज्यासाठी मी जगेल तर या समाज्यासाठी मी मरेल तर या समाज्यासाठी ।। २ ।। क्रांतिदिनी ती घेऊन आन दलितांची करील उज्वल शान क्रांतिदिनी ती घेऊन आन दलितांची करील उज्वल शान नाही होणार भाषा माझी खोटी नाही होणार भाषा माझी खोटी मी जगेल तर या समाज्यासाठी मी जगेल तर या समाज्यासाठी मी मरेल तर या समाज्यासाठी ।। ३।। हक्कासाठी मी संग्राम करिन  काळीनंदाला हाती धरीन हक्कासाठी मी संग्राम करिन  काळीनंदाला हाती धरीन जरी खाया मिळाली ना रोटी जरी खाया मिळाली ना रोटी मी जगेल तर या समाज्यासाठी मी जगेल तर या समाज्यासाठी मी मरेल तर ...

विद्येचा राजा झाला

भीमजन्मा आला विद्येचा राजा झाला भीमजन्मा आला विद्येचा राजा झाला त्याने उद्धार आमचा केला ग ग ग त्याने उद्धार आमचा केला त्याने उद्धार आमचा केला ग ग ग त्याने उद्धार आमचा केला  ।। धृ ।। एकोणीसशे सत्तावीस ला तो क्रांतिवीर दिसला एकोणीसशे सत्तावीस ला तो क्रांतिवीर दिसला चवदार पाणी प्याला ग ग ग चवदार पाणी प्याला चवदार पाणी प्याला ग ग ग चवदार पाणी प्याला ।। १ ।। नाशिक च्या देवळाला दिन दलित घेऊन गेला नाशिक च्या देवळाला दिन दलित घेऊन गेला काळाराम नाही भ्याला ग ग ग काळाराम नाही भ्याला काळाराम नाही भ्याला ग ग ग काळाराम नाही भ्याला  ।। २ ।। दलितांच्या हितकामी बोले येवला मुक्कामी दलितांच्या हितकामी बोले येवला मुक्कामी  हिंदू धर्मा दिला टोला ग ग ग हिंदू धर्मा दिला टोला हिंदू धर्मा दिला टोला ग ग ग हिंदू धर्मा दिला टोला  ।।३ ।। परदेशी भीम गेला पदव्या त्या घेऊन आला परदेशी भीम गेला पदव्या त्या घेऊन आला  घटनेचा मान त्याला ग ग ग घटनेचा मान त्याला घटनेचा मान त्याला ग ग ग घटनेचा मान त्याला  ।।  ४।। गांधी उपोषणाला भीमराव सज्ज झाला गांधी उपोषणाला भीमराव सज...

हिंदू म्हणून मी आता मारणार नाही

हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही डरनार नाही हिंदू म्हणून मी आता मारणार नाही हिंदू म्हणून मी आता मारणार नाही  हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। धृ ।। जन्मलो जरी मी हिंदू म्हणून जन्मलो जरी मी हिंदू म्हणून  मरणार नाही मी हिंदू म्हणून मरणार नाही मी हिंदू म्हणून हीन संस्कृतीला मी विसरणार हीन संस्कृतीला मी विसरणार  हीन संस्कृतीला मी विसरणार हिंदू म्हणून मी आता मारणार नाही हिंदू म्हणून मी आता मारणार नाही  हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। १।। मिळवू न शकलो बहुजन हिताला मिळवू न शकलो बहुजन हिताला घालून घेईन गोळी स्वतःला घालून घेईन गोळी स्वतःला  मागे आता मी सरणार नाही मागे आता मी सरणार नाही मागे आता मी सरणार नाही हिंदू म्हणून मी आता मारणार नाही हिंदू म्हणून मी आता मारणार नाही  हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। २।। माझ्या बांधवांच्या न्याय हक्काचसाठी माझ्या बांधवांच्या न्याय हक्काचसाठी लावीन मी माझ्या प्राणाची कसोटी लावीन मी माझ्या प्राणाची कसोटी  रणी अपयशी मी ठरणार नाही रणी अपयशी मी ठरणार नाही रणी...

दिसे शोभून शोभून भीम लाखात

काय सांगू त्यांची वाणी माझ्या भीमाची कहाणी काय सांगू त्यांची वाणी माझ्या भीमाची कहाणी असा विद्वान नाही या जगात दिसे शोभून शोभून भीम लाखात दिसे शोभून शोभून भीम लाखात  ।। धृ ।। भीमाईचे चे ते चौदावे रत्न केले साकार दीनांचे स्वप्न  भीमाईचे चे ते चौदावे रत्न केले साकार दीनांचे स्वप्न  झिजवू तनमन ज्योती नयन जाळून झिजवू तनमन ज्योती नयन जाळून  सदा झटले उन्हातान्हात दिसे शोभून शोभून भीम लाखात दिसे शोभून शोभून भीम लाखात  ।। १ ।। त्यांनी वेचून ज्ञानाचे कण आले बॅरिस्टर पदवी घेऊन त्यांनी वेचून ज्ञानाचे कण आले बॅरिस्टर पदवी घेऊन भीमाची हि हुशारी दिल्लीच्या दरबारी भीमाची हि हुशारी दिल्लीच्या दरबारी  घटना लिहून केले चकित दिसे शोभून शोभून भीम लाखात दिसे शोभून शोभून भीम लाखात  ।। २ ।। कार्य भीमाचं असं दमदार नाव लिहले सरकारी नाण्यावर कार्य भीमाचं असं दमदार नाव लिहले सरकारी नाण्यावर असे मिळवले यश पाहून झाले खुश असे मिळवले यश पाहून झाले खुश  लाखो जण सारे गावागावात दिसे शोभून शोभून भीम लाखात दिसे शोभून शोभून भीम लाखात  ।। ३ ।। किती सांगू...

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न  घडविला इतिहास नवा घडविला इतिहास नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। धृ ।। चार वर्णात ब्राह्माण श्रेष्ठ शुद्राने तर उपसावे कष्ट जिद्दीने माझे भीमराव शिकले जाळला तो मनू अनिष्ट उच्च पदवीधर जगात ठरला उच्च पदवीधर जगात ठरला  वैऱ्याची  गेली हवा वैऱ्याची  गेली हवा  म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। १ ।। भीमराव जागला बुद्धाच्या वचना केली आदर्श समाज रचना स्त्री पुरुष सामान सारे इथे कुणी रे ते उच नीच ना बहुजनांचा करून कायदा बहुजनांचा करून कायदा  झाला दीनांचा दुवा झाला दीनांचा दुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। २ ।। आणलं त्याने लोकांच राज भाग्य उजळलं तुझं नि माझं शिल्पकार या संविधानाचा शोभून दिसतोय ग भीमराज चहुमुलखीं हा झाला खरोखर चहुमुलखीं हा झाला खरोखर  कार्याचा गवगवा त्याच्या क...

सुखाने राहू दे माझे काळ मणी

सोन्यामोत्याची माळ गली बांधो कुणी सोन्यामोत्याची माळ गली बांधो कुणी सुखाने राहू दे माझे काळ मणी सुखाने राहू दे माझे काळ मणी सोन्यामोत्याची माळ गली बांधो कुणी सुखाने राहू दे माझे काळ मणी सुखाने राहू दे माझे काळ मणी ।। धृ ।। परदेशी साहेब जाताच ग आठव बाई मजला तो होतोच ग परदेशी साहेब जाताच ग आठव बाई मजला तो होतोच ग ना दिसता ग मला रात वाटे सुनी सुखाने राहू दे माझे काळ मणी सुखाने राहू दे माझे काळ मणी ।। १ ।। साहेब बाई माझे ग विद्याधर नाव तयांचे गाजे जगभर साहेब बाई माझे ग विद्याधर नाव तयांचे गाजे जगभर  माझ्या साहेबांवाणी जगी नाही कुणी सुखाने राहू दे माझे काळ मणी सुखाने राहू दे माझे काळ मणी।। २।। साहेबांचे बाई ग नाव मुखी त्यातच ग  बाई मी आहे सुखी साहेबांचे बाई ग नाव मुखी त्यातच ग  बाई मी आहे सुखी  ज्ञान पुस्तकी ग करते आठवणी सुखाने राहू दे माझे काळ मणी सुखाने राहू दे माझे काळ मणी।। ३ ।। सकपाळ कुळाची आहे मी ग सून स्वाभिमानी उर माझा येते भरून सकपाळ कुळाची आहे मी ग  सून स्वाभिमानी उर माझा येते भरून अंगावर साडी जरी असली जुनी सुखाने राहू दे माझे काळ ...

क्रांतिवादळाची रमा झाली सावली

हि इतिहासाची ग्वाही तुझी कष्ट दाखला देई  अर्धांगिनी हि महापुरुषाची क्रांतिगाथेचा अर्थ रमाई  प्रज्ञासुर्य जीवलगास दिशा दावली  प्रज्ञासुर्य जीवलगास दिशा दावली  क्रांतिवादळाची रमा झाली सावली  क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।।धृ ।। सात समिंदरापल्याड गेला दिलाचा तो यशवंत झाला  परी इथे संसार केला मिळाला हा दाखला जगाला  अशी थोर माता दिनाची माउली  अशी थोर माता दिनाची माउली   क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।।१ ।। वेचले हे निखारे रमाने घडविले साहेब साहसाने  शोषिले ते दुःख आनंदाने धीर दिला पतीला मनाने  काया चंदनापरी झिजाया ठेवली  काया चंदनापरी झिजाया ठेवली  क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।। २ ।।  सून रामाजीची लाई गुणांची मूर्तिमंत रामू साहेबांची  सांजवात झाली समाजाची ज्योत देई पती चिंतनाची  पतीच्या सुखांमध्ये रमा सुखावली  पतीच्या सुखांमध्ये रमा  सुखावली  क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।। ३ ।।   कोटी लेकरांची हि आरोळी क्रांतीसाठी ठरली या जिव्हाळी  भावनेची जाळलीया होळ...

अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन

जाऊ जोडीने येऊ ग पाहून , जाऊ जोडीने येऊ ग पाहून अशी दीक्षा भूमीची शान,  अशी दीक्षा भूमीची शान  अग हे दान दिलय ग भीमानं,  अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। धृ ।। दरवर्षाला सण हा येतो दसरा अन ती दिवाळी फार दुरुनी येति पाहण्या लाखो दलित मंडळी असं केलंय कार्य महान , असं केलंय कार्य महान दीक्षा बुद्धाची देऊन अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। १  ।। लाखमोलाचा होता माझा ज्ञानिवांत भीमराया त्याच भीमाने रचला ऐसा धर्मांतराचा पाया केलं आम्हाला जगी सुज्ञान , केलं आम्हाला जगी सुज्ञान   दीक्षा बुद्धाची देऊन अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। २ ।।  जनसागर हा धावून आला बाबा भीमाच्या चरणावर कोरियले ते भीमरावाने कोटी जनांच्या हृदयावर बुद्धं शरणं  मंत्र महान ,बुद्धं शरणं  मंत्र महान  दीक्षा  बुद्धाची देऊन अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। ३  ।। बाबा भीमाची ती पुण्याई आली फळाला फोलून दीक्षाभूमीचा सोहळा आज दिसे नीर...

सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली

छप्पन ची विजया दशमी विश्वात गाजली छप्पन ची विजया दशमी विश्वात गाजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली  ।। धृ ।। झुगारून जुन्या रीती आणि साऱ्या जुन्या परंपरा उद्धराया जण जगात महान मार्ग दाविला खरा झुगारून जुन्या रीती आणि साऱ्या जुन्या परंपरा उद्धराया जण जगात महान मार्ग दाविला खरा त्रिशरण पंचशीला गगनी निनादली त्रिशरण पंचशीला गगनी निनादली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली  ।। १ ।। असून माणूस दूर ठेविले मानवाने मानवा मायेचा ओलावा भीमाने दिलाय या तहानलेल्या जीवा असून माणूस दूर ठेविले मानवाने मानवा मायेचा ओलावा भीमाने दिलाय या तहानलेल्या जीवा बुद्धाची वाणी लाखो जनात पाजली बुद्धाची वाणी लाखो जनात पाजली  सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली  ।। २ ।। चंद्रमणी सवे मंगल मधुर बोलता मंत्र पाली धन्य धन्य तो सागर झाला धरणी हि शहारली चंद्रमणी सवे मंगल मधुर बोलता मंत्र पाली धन्य धन्य तो सागर झाला धरणी हि शहारली बुद्धाची जेव्हा हृदयी मूर्ती विराजली  ब...

धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं

धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। धृ ।। दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तक नामवावं बुद्धचरणी हात जोडुनी तृष्णेला शमवावं दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तक नामवावं बुद्धचरणी हात जोडुनी तृष्णेला शमवावं धम्माचे महत्व बोधिसत्व मनात ठसाव धम्माचे महत्व बोधिसत्व मनात ठसाव पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। १ ।। प्रतीक स्वच्छ सुंदर असत धम्म संघात मार्गदर्शन पावन करत सभ्यतेच्या रंगात प्रतीक स्वच्छ सुंदर असत धम्म संघात मार्गदर्शन पावन करत सभ्यतेच्या रंगात मनातले जे असाल काळ त्यांनीच पुसाव मनातले जे असाल काळ त्यांनीच पुसाव पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। २ ।। भीम बुद्ध जयंती सण मानती बुद्धजन शुभ्र वस्त्राला ग बाई आहे बहुमान भीम बुद्ध जयंती सण मानती बुद्धजन शुभ्र वस्त्राला ग बाई आहे बहुमान हरिनंदाला ह्या जनतेला हे लेन दिसावं हरिनंदाला ह्या जनतेला हे लेन दिसावं पांढरी साडी नेसून बुद्ध प...