विद्येचा राजा झाला

भीमजन्मा आला विद्येचा राजा झाला
भीमजन्मा आला विद्येचा राजा झाला
त्याने उद्धार आमचा केला ग ग ग त्याने उद्धार आमचा केला
त्याने उद्धार आमचा केला ग ग ग त्याने उद्धार आमचा केला  ।। धृ ।।
एकोणीसशे सत्तावीस ला तो क्रांतिवीर दिसला
एकोणीसशे सत्तावीस ला तो क्रांतिवीर दिसला
चवदार पाणी प्याला ग ग ग चवदार पाणी प्याला
चवदार पाणी प्याला ग ग ग चवदार पाणी प्याला ।। १ ।।
नाशिक च्या देवळाला दिन दलित घेऊन गेला
नाशिक च्या देवळाला दिन दलित घेऊन गेला
काळाराम नाही भ्याला ग ग ग काळाराम नाही भ्याला
काळाराम नाही भ्याला ग ग ग काळाराम नाही भ्याला  ।। २ ।।
दलितांच्या हितकामी बोले येवला मुक्कामी
दलितांच्या हितकामी बोले येवला मुक्कामी 
हिंदू धर्मा दिला टोला ग ग ग हिंदू धर्मा दिला टोला
हिंदू धर्मा दिला टोला ग ग ग हिंदू धर्मा दिला टोला  ।।३ ।।
परदेशी भीम गेला पदव्या त्या घेऊन आला
परदेशी भीम गेला पदव्या त्या घेऊन आला 
घटनेचा मान त्याला ग ग ग घटनेचा मान त्याला
घटनेचा मान त्याला ग ग ग घटनेचा मान त्याला  ।।  ४।।
गांधी उपोषणाला भीमराव सज्ज झाला
गांधी उपोषणाला भीमराव सज्ज झाला 
त्या पुणे कराराला ग ग ग त्या पुणे कराराला
त्या पुणे कराराला ग ग ग त्या पुणे कराराला ।। ५ ।।
एकोणीसशे छप्पन झाला भीम गेला नागपुराला
एकोणीसशे छप्पन झाला भीम गेला नागपुराला
त्या विज़या दशमीला ग ग ग  त्या विजया दशमीला
त्या विज़या दशमीला ग ग ग  त्या विजया दशमीला ।। ६ ।।
आनंद मिलिंदाला सांगणे समाजाला
आनंद मिलिंदाला सांगणे समाजाला 
भीम आमचा रखवाला ग ग ग भीम आमचा रखवाला
भीम आमचा रखवाला ग ग ग भीम आमचा रखवाला  ।।६।।
भीमजन्मा आला विद्येचा राजा झाला
भीमजन्मा आला विद्येचा राजा झाला
त्याने उद्धार आमचा केला ग ग ग त्याने उद्धार आमचा केला
त्याने उद्धार आमचा केला ग ग ग त्याने उद्धार आमचा केला  ।। धृ ।।




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा