हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही

ताट मानेने सदाच जगला
ताट मानेने सदाच जगला
तोल हि ढळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। धृ ।।
यांनी केवळ जय जयकारा घसा फाडला आपला
आणि पहा तर दगडा खाली हात काढला आपला
यांनी केवळ जय जयकारा घसा फाडला आपला
आणि पहा तर दगडा खाली हात काढला आपला
तो  तर आपल्या कार्यासाठी
तो  तर आपल्या कार्यासाठी  कधी हि ढळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। १ ।।
कैक होऊन नेते आपल्या टोळ्या घेऊन फिरती
याना कितीतरी दारोदारी झोळ्या घेऊन फिरती
कैक होऊन नेते आपल्या टोळ्या घेऊन फिरती
याना कितीतरी दारोदारी झोळ्या घेऊन फिरती
पण भिक्षेसाठी भीम कुणाच्या
पण भिक्षेसाठी भीम कुणाच्या   दारी वळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। २ ।।
स्वाभिमानाची जपण्याची यांना काळजी कुठली
हाजीहाजी  ती करण्याची लाज जणू का सुटली
स्वाभिमानाची जपण्याची यांना काळजी कुठली
हाजीहाजी  ती करण्याची लाज जणू का सुटली
एकेमकांवर यातील सांगा
एकेमकांवर यातील सांगा कोण हो जळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। ३ ।।
दुनिया बघते आहे यांचे लाचारीचे जगणे
आता उरले हृदयनाथा केवळ चाले बघणे
दुनिया बघते आहे यांचे लाचारीचे जगणे
आता उरले हृदयनाथा केवळ चाले बघणे
यांच्या लाचारीचा एक हि
यांच्या लाचारीचा एक हि  दिस तो  टळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। ४ ।।
ताट मानेने सदाच जगला
ताट मानेने सदाच जगला
तोल हि ढळला नाही
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही 
हा पहाडावाणी बाबा मुतखड्याना कळला नाही ।। धृ ।।










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा