उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा

सरली निशा हसली उषा
आनंदल्या दाही दिशा
सरली निशा हसली उषा
आनंदल्या दाही दिशा
देणगी मिळाली मानवा
उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा
उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। धृ ।।
धन्य ती माता भिमाई पोटी आला रामाचा लाल
चौदा एप्रिल या दिनी समतेचा झाला उष:काल
धन्य ती माता भिमाई पोटी आला रामाचा लाल
चौदा एप्रिल या दिनी समतेचा झाला उष:काल
रखरखत्या उन्हामध्ये
एक्यानव सनामध्ये
रखरखत्या उन्हामध्ये
एक्यानव सनामध्ये
चैतामध्ये गारवा
उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। १ ।।
भारत भूमीचा सुपुत्र जन्माला या मंगल दिनी
फुलोरा फुलिनी आला दलितांच्या घरी अंगणी
भारत भूमीचा सुपुत्र जन्माला या मंगल दिनी
फुलोरा फुलिनी आला दलितांच्या घरी अंगणी
निळ्या नभी निळा नवा
लाखांमध्ये एक दिवा
निळ्या नभी निळा नवा
लाखांमध्ये एक दिवा
शीतल जणू चांदवा
उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। २ ।।
महू गाव सारे नाचले उधळीत सप्तरंग
हर्षाने भरुनी आले दुबळ्यांचे अंतरंग
महू गाव सारे नाचले उधळीत सप्तरंग
हर्षाने भरुनी आले दुबळ्यांचे अंतरंग
धन्य धन्य हा जन्म
सार्थक हे दीपश्याम
धन्य धन्य हा जन्म
सार्थक हे दीपश्याम
जिवा लागे या गोडवा
उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। ३ ।।
सरली निशा हसली उषा
आनंदल्या दाही दिशा
सरली निशा हसली उषा
आनंदल्या दाही दिशा
देणगी मिळाली मानवा
उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा
उद्धारण्या  तारण्या जन्मले भिवा ।। धृ ।।







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा