मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात

भल्या माणसा अंधरूढीच्या का गुदमरशी धुरात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। धृ ।।
तू क्रित्येक वाऱ्या केल्या होऊनिया वारकरी
समाधान सुख शांती रे तुला मिळणार नाही तरी
तू क्रित्येक वाऱ्या केल्या होऊनिया वारकरी
समाधान सुख शांती रे तुला मिळणार नाही तरी
घातक ऎस्या जीव घेणाऱ्या वाहू नको तू पुरात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। १ ।।
धम्म बुद्धाचा स्वीकारता जीवनाला येई गती
सोड अंधश्रद्धेचा छंद अरे होईल तुझी भ्रमंती 
धम्म बुद्धाचा स्वीकारता जीवनाला येई गती
सोड अंधश्रद्धेचा छंद अरे होईल तुझी भ्रमंती 
शुद्ध करावे आपले तनमन राहू नको त्या भ्रमात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। २ ।।
परिवर्तन भीमाने केले मग केले हे धर्मांतर
त्या दीक्षाभूमीवर शुद्ध होईल रे अंतर 
परिवर्तन भीमाने केले मग केले हे धर्मांतर
त्या दीक्षाभूमीवर शुद्ध होईल रे अंतर 
कुचकामी त्या जीर्ण विचारा नको साठवू उरात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। ३ ।।
येणाऱ्या संकटावरी जोमानं करावी मात
त्यागुनी ते सर्व काही जोड बुद्ध धम्माशी नातं
येणाऱ्या संकटावरी जोमानं करावी मात
त्यागुनी ते सर्व काही जोड बुद्ध धम्माशी नातं
वाल्मीकाचें मधुर गीत आनंदाच्या सुरात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। ४ ।।
भल्या माणसा अंधरूढीच्या का गुदमरशी धुरात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात
मनाच्या शांतीसाठी जा जा बुद्धाच्या नागपुरात ।। धृ ।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा