माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा
अशिक्षित जरूर मी लेखू नको मज कमी
अशिक्षित जरूर मी लेखू नको मज कमी परिचय स्वःताच देते परिचय स्वतःचा
माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा
माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा ।। धृ ।।
प्रतिव्रतेचा दाखला माझा या जन्मीचा सोबती राजा
धनी मला साजतो दाही दिशा गाजतो
धनी मला साजतो दाही दिशा गाजतो
डंका तो कीर्तीचा त्याच्या डंका तो कीर्तीचा
माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा ।। १ ।।
या देशाचा नेक हा नेता बौद्ध जनांचा जीवनदाता
फिरतो आज मानवा ज्ञानाचा देवन दिवा
फिरतो आज मानवा ज्ञानाचा देवन दिवा
मार्ग नव हिताचा तो मार्ग नव हिताचा
माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा ।। २ ।।
या पोलादी झुंजाराची आहे मी पत्नी धुरंधराची
ना कुणी या सारखा जनहिताचा म्होरका
ना कुणी या सारखा जनहिताचा म्होरका
सारथी रथाचा तो सारथी रथाचा
माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा ।। ३ ।।
अशिक्षित जरूर मी लेखू नको मज कमी
अशिक्षित जरूर मी लेखू नको मज कमी परिचय स्वःताच देते परिचय स्वतःचा
माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा
माझं नाव हाय रमाई धनी पिता भारताचा ।। धृ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा