क्रांतिवादळाची रमा झाली सावली

हि इतिहासाची ग्वाही तुझी कष्ट दाखला देई 
अर्धांगिनी हि महापुरुषाची क्रांतिगाथेचा अर्थ रमाई 
प्रज्ञासुर्य जीवलगास दिशा दावली 
प्रज्ञासुर्य जीवलगास दिशा दावली 
क्रांतिवादळाची रमा झाली सावली 
क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।।धृ ।।
सात समिंदरापल्याड गेला दिलाचा तो यशवंत झाला 
परी इथे संसार केला मिळाला हा दाखला जगाला 
अशी थोर माता दिनाची माउली 
अशी थोर माता दिनाची माउली  
क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।।१ ।।
वेचले हे निखारे रमाने घडविले साहेब साहसाने 
शोषिले ते दुःख आनंदाने धीर दिला पतीला मनाने 
काया चंदनापरी झिजाया ठेवली 
काया चंदनापरी झिजाया ठेवली 
क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।। २ ।। 
सून रामाजीची लाई गुणांची मूर्तिमंत रामू साहेबांची 
सांजवात झाली समाजाची ज्योत देई पती चिंतनाची 
पतीच्या सुखांमध्ये रमा सुखावली 
पतीच्या सुखांमध्ये रमा  सुखावली 
क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।। ३ ।।  
कोटी लेकरांची हि आरोळी क्रांतीसाठी ठरली या जिव्हाळी 
भावनेची जाळलीया होळी नवे पर्व झाली रमा भोळी 
 भीम यशात सागर इथे विसावली  भीम यशात सागर इथे विसावली 
क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।। ४ ।।  
प्रज्ञासुर्य जीवलगास दिशा दावली 
प्रज्ञासुर्य जीवलगास दिशा दावली 
क्रांतिवादळाची रमा झाली सावली 
क्रांतिवादळाची रमा झाली सावली ।।धृ ।।





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा