श्रम माझे बाळांनो आठवूनी
श्रम माझे बाळांनो आठवूनी
हे रक्त स्वतःचे घटवूनि
प्रचाराचे रान हे उठवुनी हो हो होहो
प्रचाराचे रान हे उठवुनी बुद्धाचा धम्म द्या पटवूनि
श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। धृ ।।
हा राग द्वेष मोह माया नको
अविचार असा हा मुळीच नको
प्रज्ञा शील करुणा आचरणी
पाप कर्म अनीती मुळीच नको
त्रिशरण आणि ती पंचशीला हो हो हो हो हो
त्रिशरण आणि ती पंचशीला अष्टांगिक मार्ग तो आचारुनी
श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। १ ।।
धर्म जाती भेद मुळीच नको
माणसा माणसात हा वाद नको
रक्तपात नको घातपात नको
मानवाच्या जिव्हारी आघात नको
रक्ताची हि नाती जुळवुनी हो हो हो हो हो हो
रक्ताची हि नाती जुळवुनी विषमतेला त्या कटवुनी
श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। २ ।।
मानवता खंगलीभ्रांतीने
जे दिले ते आठवा मातीने
बुद्धाच्या सम्यक क्रांतीने
क्रांती हि घडवा शांतीने
जगू या रे सारे प्रेमाने हो हो हो हो हो हो हो
जगू या रे सारे प्रेमाने प्रभाकरा भारत नटवूनि
श्रम माझे बाळांनो आठवूनी ।। ३ ।।
संघटना एकीने साधावी
ममतेने तुम्ही ती बांधावी
बोधिवृक्ष फुलू द्या हि पालवी
सुख शांती जीवनी लाभावी
बुद्ध कबीर फुलेंच्या विचारांनी हो हो हो हो हो हो
बुद्ध कबीर फुलेंच्या विचाराने अविचारा ठेवा घटवूनि
श्रम माझे बाळांनो आठवूनी ।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा