येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

वदे रमाई साजन बाई ग
काय सांगू ती नवलाई
मन गहिरवलं फुलून बहरलं
मन गहिरवलं फुलून बहरलं 
पतुर आलाय आज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं
गुणी गुणांचा राज दिनाचा थाटण्या संसार साज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। धृ ।।
गोड गोड हि कानी पडली सुमधुर ग वाणी
धान्य जाहले ऐकून सार त्या राजाची राणी
गोड गोड हि कानी पडली सुमधुर ग वाणी
धान्य जाहले ऐकून सार त्या राजाची राणी 
साकार झालं फळाला आलं सपान वैभव ताज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। १ ।।
दुभळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी
त्या  बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी
दुभळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी
त्या  बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी
मनी ग स्पुर्ती पाहून कीर्ती मन हे मनात लाज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। २ ।।
आई अशी मी  कोटी जणांची नशीब माझं थोर ग
त्या घरट्यात पाजीन पाणी हि मायेची धार ग
आई अशी मी  कोटी जणांची नशीब माझं थोर ग
त्या घरट्यात पाजीन पाणी हि मायेची धार ग
दुःखितांचा शोषितांचा शिरी वाहण्या ओझं
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। ३ ।।
कुंकू भाळी हे भाग्याच झालं आज धनवान
गळी पोत हि काळ्या मण्यांची भासे मौल्यवान
कुंकू भाळी हे भाग्याच झालं आज धनवान
गळी पोत हि काळ्या मण्यांची भासे मौल्यवान
सांगू कसे ग वाट असे ग हर्षदा दिलराज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। ४।।
गुणी गुणांचा राज दिनाचा थाटण्या संसार साज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं ।। धृ ।।











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा