अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन

जाऊ जोडीने येऊ ग पाहून , जाऊ जोडीने येऊ ग पाहून
अशी दीक्षा भूमीची शान,  अशी दीक्षा भूमीची शान 
अग हे दान दिलय ग भीमानं,  अग हे दान दिलय ग भीमानं
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। धृ ।।
दरवर्षाला सण हा येतो दसरा अन ती दिवाळी
फार दुरुनी येति पाहण्या लाखो दलित मंडळी
असं केलंय कार्य महान , असं केलंय कार्य महान
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। १  ।।
लाखमोलाचा होता माझा ज्ञानिवांत भीमराया
त्याच भीमाने रचला ऐसा धर्मांतराचा पाया
केलं आम्हाला जगी सुज्ञान , केलं आम्हाला जगी सुज्ञान  
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। २ ।।
 जनसागर हा धावून आला बाबा भीमाच्या चरणावर
कोरियले ते भीमरावाने कोटी जनांच्या हृदयावर
बुद्धं शरणं  मंत्र महान ,बुद्धं शरणं  मंत्र महान
 दीक्षा  बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। ३  ।।
बाबा भीमाची ती पुण्याई आली फळाला फोलून
दीक्षाभूमीचा सोहळा आज दिसे नीरजा खुलून
त्या आनंदाला दीधलाय मान , त्या आनंदाला दीधलाय मान
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। ४ ।।
जाऊ जोडीने येऊ ग पाहून , जाऊ जोडीने येऊ ग पाहून
अशी दीक्षा भूमीची शान,  अशी दीक्षा भूमीची शान 
अग हे दान दिलय ग भीमानं,  अग हे दान दिलय ग भीमानं
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं  दीक्षा बुद्धाची देऊन।। धृ ।।

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा