पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी

पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी
पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी
साधून घे संधी तुझ्या या जीवनामधी
साधून घे संधी तुझ्या या जीवनामधी 
पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। धृ ।।
जीवहिंसा ती नको चोरी करणे ते नको
अनाचार तो नको खोटे बोलणे नको
नशिली नशा नको चुकीची दिशा नको
उगा तमाशा नको पदरी निराशा नको
कुठे  तू आहे तुला शोधी राहू नको धुंदी मधी
पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। १ ।। 
मनात घोळ नको फिरू गोलगोल नको
बुडशील डोहामधी जाऊ तू खोल नको
चंचल वागणे हे खोटा डामडौल नको
संयम राख सदा ढळू देऊ तोल नको
ठरतील सर्व तुझ्या व्याधी राहू नको धुंदीमधी
पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। २ ।।
आचरण कर शुद्ध मानाने हो शुद्ध
होशील तेव्हा तू सम्यक संबुद्ध
देव मनि जिद्द नको राहू निर्बुद्ध
कुंदन धम्माचा लुटू ये आनंद
जीवनी होशील ल सुगंधी राहू नको धुंदीमधी
पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी।। ३।।
पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी
पंचशीला पाळ तू आधी राहू नको धुंदीमधी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा