पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा

वाट पाहुनिया थकला जीव त्यांचा वाट पाहुनिया थकला जीव त्यांचा असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।। धृ ।। पनवेल च्या नाक्यावर सोनबा तो उभा पाहिले उतरताना गाडीतून बाबा पाहिले उतरताना गाडीतून बाबा  जीव तो तृषित  ऋतु उन्हाळ्याचा असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।१।। कोरड्या जिभेला ओलावा मिळावा वाटले भीमाला पाणी थोडे प्यावं वाटले भीमाला पाणी थोडे प्यावं तरी खेद झाला दूर प्रसंगाचा असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।२।। धावत सोनबा घरी आला जेव्हा गाडी भीम बाबाची निघून गेली तेव्हा गाडी भीम बाबाची निघून गेली तेव्हा  माठ घेऊनिया आला हो पाण्याचा असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।३।। प्रतीक पुन्हा येते याच वाटेवरी माझ्या भीमबाबाची येईल ती स्वारी माझ्या भीमबाबाची येईल ती स्वारी डोळे भरून पाहीन वाली गरिबांचा असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।४।।  

कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण

कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर  गाण कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर  गाण बोधीवृक्षा खाली मिळाले बुद्धालाते ध्यान ।। धृ।। सुख त्यागुनी दुःखाचा घेतला तो शोध नव्या प्रकाशाने दिधला मानवास बोध नश्वर हे जीवन आहे ठेवा मनी जाण कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर  गाण।। १।। असित मुनींची वाणी अशी खरी ठरली भिक्षुकांची ओंजळ ज्ञानाने भरली प्रबुद्ध तू हो मानवा दिले हेच ज्ञान कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर  गाण।।२।। सत्य अहिंसेची शिकवन निनादे या जगती मना सुख देईल नित्य दया क्षमा शान्ती प्रथमा हे जीवन आहे पिंपळाचे पान कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर  गाण ।। ३ ।।

सारे जयभीम जयभीम बोलू

या हो एकीने  आता डोळु या हो एकीने  आता डोळु सारे जयभीम जयभीम बोलू ।।धृ ।। शिकवण हि भीमाची नेक एकीने व्हारे एक दृश्य पाहण्या नयन हे खोलू दृश्य पाहण्या नयन हे खोलू  सारे जयभीम जयभीम बोलू ।।१।। गटबाजी हि बाजूला ठेवा करू एकीने समाजसेवा कार्यचक्र हे ठेवू या चालू कार्यचक्र हे ठेवू या चालू  सारे जयभीम जयभीम बोलू ।।२।। भीमकार्याची कास धरा हो भीम स्वप्न हे साकार करा हो एकमेका हि शपथ घालू एकमेका हि शपथ घालू सारे जयभीम जयभीम बोलू ।।३।। निळा झेंडा हा घेऊन हाती हक्कासाठी करु ज्ञान क्रांती बोल प्रथमा हे प्रेमाने बोलू बोल प्रथमा हे प्रेमाने बोलू सारे जयभीम जयभीम बोलू ।।४।।

तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार

जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।। धृ।। पाप पुण्य घडे सारे तुझ्या कर्मापायी कर्ता आणि करविता दुजा कोणी नाही पाप पुण्य घडे सारे तुझ्या कर्मापायी कर्ता आणि करविता दुजा कोणी नाही सोड सोड भ्रांती वेड्या करी तू विचार सोड सोड भ्रांती वेड्या करी तू विचार  तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।१।। जैसे बीज पेरशील तैसे उगवेल बीजापरी तुझ्या हाती फळ ते मिळेल जैसे बीज पेरशील तैसे उगवेल बीजापरी तुझ्या हाती फळ ते मिळेल सान थोर ठरशील रे  तू कर्मानुसार सान थोर ठरशील रे  तू कर्मानुसार तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।२।। खरं खोटे काय याचा घेई स्वतः शोध दुःखाचे हे कारण तृष्णा बुद्धाचा हा बोध खरं खोटे काय याचा घेई स्वतः शोध दुःखाचे हे कारण तृष्णा बुद्धाचा हा बोध भल्या माणसा विज्ञानाचा करी तू स्वीकार भल्या माणसा विज्ञानाचा करी तू स्वीकार  तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।३।। पंचशील मार्गाने हे जीवन शुद्ध होई अष्टांगिक मार्गाने तू निर्वाणास जाई पंचशील मार्गा...

पूजा ग भिमाई आणि रमाई

जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई पूजा ग भिमाई आणि रमाई पूजा ग भिमाई आणि रमाई  ।।धृ।। ज्याने दीनांचा सांभाळ केला जिजाऊ ने तो पुत्र प्रसवला ज्याने दीनांचा सांभाळ केला जिजाऊ ने तो पुत्र प्रसवला ना सटवाई ना भुवनाई थोर ठरली ती शिवाई पूजा ग भिमाई आणि रमाई  ।।१।। शिक्षण घेऊन सुज्ञान येईल ज्ञानाने ते अज्ञान जाईल शिक्षण घेऊन सुज्ञान येईल ज्ञानाने ते अज्ञान जाईल झाशीची राणी ती मर्दानी आठवा सावित्रीबाई पूजा ग भिमाई आणि रमाई  ।।२।। आजवर पुजले आणि भजले उपवास केले नवस लावले आजवर पुजले आणि भजले उपवास केले नवस लावले सांगायला माय पडलं पदरात काय पडलं कोण कामी आली का ती आई पूजा ग भिमाई आणि रमाई  ।।३।। विज्ञानाच्या आजच्या युगात कस काय येतंय सांगा अंगात विज्ञानाच्या आजच्या युगात कस काय येतंय सांगा अंगात ते कर्मकांड सार थोतांड तुडवावे तुम्ही पायी पूजा ग भिमाई आणि रमाई  ।।४।। धम्म बुद्धाचा जगात गोड सवे परागा लागू द्या ओढ खीर देऊन महान ठरली ती सुजातामाई पूजा ग भिमाई आणि रमाई  ।।५।। जनाई ला काय मरिआईला का...

तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग

लई श्रमान परिश्रमान ओ ओ ओ लई श्रमान परिश्रमान सुखाचा करून त्याग सुखाचा करून त्याग तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।धृ।। नुसता दिसाया दिसतो तू भीम अनुयायी तुझी डरकाळी कानी आता पडत नाही नुसता दिसाया दिसतो तू भीम अनुयायी तुझी डरकाळी कानी आता पडत नाही अंग झटकून उठ गर्जून ओ ओ ओ अंग झटकून उठ गर्जून का घेतोस बकरीचा सोंग का घेतोस बकरीचे सोंग तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।१।। तुझ्या अंगात आहे त्या वाघाची खाल दे डरकाळी ऐसी आता जबडा खोल तुझ्या अंगात आहे त्या वाघाची खाल दे डरकाळी ऐसी आता जबडा खोल लांब सडक घे तू झडप ओ ओ ओ लांब सडक घे तू झडप कर वैऱ्याची भागम भाग कर वैऱ्याची भागम भाग तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।२।। असा  पिंजऱ्यात कैदी तू होऊ नको रे त्या सर्कस वाणी गोल फिरू नको रे असा  पिंजऱ्यात कैदी तू होऊ नको रे त्या सर्कस वाणी गोल फिरू नको रे उठ वीरा तू  भीम नरा तू ओ ओ ओ ओ उठ वीरा तू भीम नरा तु दाखव क्रांतीची आग तू दाखव क्रांतीची आग तुला भीमानं ...

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।धृ।। तू कुळाचा भिकारी आता आलिया भालदारी त्या गाडीत माडीत आता शंकर मल्हारी तू कुळाचा भिकारी आता आलिया भालदारी त्या गाडीत माडीत आता शंकर मल्हारी जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला  आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।१।। पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जयभीम शीळ तुकड चारल ते करतात सलाम पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जयभीम शीळ तुकड चारल ते करतात सलाम तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला  आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।२।। मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास असता महाग तू वेड्या आता बिडी नि काडीला असता महाग तू वेड्या आता बिडी नि काडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।३।। तुला भीमानं म...

देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया

सूडबुद्धीने नाही वागले सूडबुद्धीने नाही वागले कर्तव्य ते कराया कर्तव्य ते कराया देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।धृ ।। निंदक वदले देशद्रोही केली जरी बदनामी निंदक वदले देशद्रोही केली जरी बदनामी भारतरत्न भीम शेवटी आले देशाच्या कामी तारक ठरली या देशाला तारक ठरली या देशाला संविधानाची माया संविधानाची माया देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।१।। दृष्टवेळ ती वाटे परंतु त्याने फुले पेरली दृष्टवेळ ती वाटे परंतु त्याने फुले पेरली अंधारात जनामनात ज्ञान ज्योत लावली आपली उन्नती आपल्या हाती आपलाही उन्नती आपल्या हाती दवडू नका रे वाया दवडू नका रे वाया देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।२।। भीम बळाने महिला आजची घाली गवसणी आकाशी भीम बळाने महिला आजची घाली गवसणी आकाशी परंपरेला धुळी मिळवले ती नाही पायाची दासी हिंदू कोडबिल महान ठरले हिंदू कोडबिल महान ठरले उन्नतीला साधाया उन्नतीला साधाया देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।३।। धर्माचा त्या अभ्यास केला कास लावून भीमानं धर्माचा त्या अभ्यास केला कास लावून भीमानं भारत भुला  पावन केले बुद्धाच्या धम्मान समतेचा अन मानवतेच...

भीमा तुज प्रमाण कोटी कोटी

उजाड रानी किमया केलीस मोठी उजाड रानी किमया केलीस मोठी  भीमा तुज प्रमाण कोटी कोटी भीमा तुज प्रमाण कोटी कोटी भीमा तुज प्रमाण कोटी कोटी  ।।धृ ।। तव करुणेचे मेघ वर्षले सृष्टीने उतरान हर्षल तव करुणेचे मेघ वर्षले सृष्टीने उतरान हर्षले सजीव झाली दुर्लक्षित हि सृष्टी सजीव झाली दुर्लक्षित हि सृष्टी  भीमा तुज प्रमाण कोटी कोटी  ।।१।। बहुरुनी आले हे वन उपवन पुलकित झाले शोषित तनमन बहुरुनी आले हे वन उपवन पुलकित झाले शोषित तनमन काम असे कि पडे अपुरे ओटी काम असे कि पडे अपुरे ओटी  भीमा तुज प्रमाण कोटी कोटी  ।।२।। भीम जगत हे असे सुशोभित पाहुनी होती अवघे स्पंधित भीम जगत हे असे सुशोभित पाहुनी होती अवघे स्पंधित शूळ परंतु उठे खलांच्या पोटी शूळ परंतु उठे खलांच्या पोटी भीमा तुज प्रमाण कोटी कोटी  ।।३।। हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तसा अगताच्या हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तसा अगताच्या गौरव राहील सदा विनयच्या ओठी   गौरव राहील सदा विनयच्या ओठी   भीमा तुज प्रमाण कोटी कोटी  ।।४।। उजाड रानी किमया केलीस मोठी उजाड रानी किमया केलीस मोठ...

पिंपळाच्या पानावरती पाहिले चित्र गौतमाचे

पिंपळाच्या पानावरती पाहिले चित्र गौतमाचे बोधी वृक्षाने कथन केले बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। धृ  ।। किती घोर तपश्या ती देहाचे वारूळ झाले बुद्ध गया अजिंठा ही साक्षात वेरुल आले किती घोर तपश्या ती देहाचे वारूळ झाले बुद्ध गया अजिंठा ही साक्षात वेरुल आले अष्ठगाथा मंगलमय ते पावित्र्य गौतमाचे बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। १ ।। या सावलीत माझ्या विश्वाची माउली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती या सावलीत माझ्या विश्वाची माउली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकूनि झाले ते मित्र गौतमाचे बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। २ ।। कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। ३ ।। लिहले कुठेच नाही हा माझा धम्म आहे निर्वाण पदांनंतर या जगी स्तूप आहे लिहले कुठेच नाही हा माझा धम्म आहे निर्वाण पदांनंतर या जगी ...

चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ

 मलीन करण्या इभ्रतीला  मलीन करण्या इभ्रतीला  घातिला गोंधळ चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। धृ ।। रूपवान योगिनी होती चिंचा नावाची ब्राह्मणी महाश्रमन गौतमाला बदनाम  कराया क्षणी रूपवान योगिनी होती चिंचा नावाची ब्राह्मणी महाश्रमन गौतमाला बदनाम  कराया क्षणी जेतवनात जाऊ लागली जेतवनात जाऊ लागली घेऊन फुलमाळ चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ   ।। १ ।। संदेह वाढाया जणी चिंचाणे रचिला डाव उदरात वाढता पाप बुद्धाचे घेतले नाव संदेह वाढाया जणी चिंचाणे रचिला डाव उदरात वाढता पाप बुद्धाचे घेतले नाव तीर्थनाकारे  श्रावस्तीत   तीर्थनाकारे  श्रावस्तीत भिनला इसजाळ चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ   ।। २ ।। फळी पोटाशी बांधली बुद्धाचे म्हणे हे पाप काय गत करू मी बाई वाटतो मजला शाप फळी पोटाशी बांधली बुद्धाचे म्हणे हे पाप काय गत करू मी बाई वाटतो मजला शाप करू लागली एकच तेव्हा करू लागली एकच तेव्हा आकाश पाताळ चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। ३ ।। बोधिसत्व हे गौतमाचे साऱ्या जगाने या ताडलं चिंचाच्या आरोपाचा  ते पितळ उघड पाडलं बोधिस...

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले  भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। धृ  ।। दिव्य ज्ञानाचा दावुनी प्रकाश दिन दुबळ्यांचा केला विकास दिव्य ज्ञानाचा दावुनी प्रकाश दिन दुबळ्यांचा केला विकास अज्ञानाचे असुर ते दूर पळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले  ।। १ ।। जीर्ण रूढींच्या जीर्ण चालीरीती दूर केल्या देऊन मूठमाती जीर्ण रूढींच्या जीर्ण चालीरीती दूर केल्या देऊन मूठमाती अंधश्रद्धेचे सारे रान जळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले   ।। २।। साऱ्या ग्रंथांचा करुनि व्यासंग बुद्ध धम्माशी होताच दंग साऱ्या ग्रंथांचा करुनि व्यासंग बुद्ध धम्माशी होताच दंग मानवाला जीवनाचे महत्व कळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। ३ ।। निर्जीवात यात टाकीला जीव बौद्ध अमृताने केले सजीव निर्जीवात यात टाकीला जीव बौद्ध अमृताने केले सजीव प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। ४ ।। त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले  भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा ...