तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग

लई श्रमान परिश्रमान ओ ओ ओ
लई श्रमान परिश्रमान
सुखाचा करून त्याग सुखाचा करून त्याग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।धृ।।
नुसता दिसाया दिसतो तू भीम अनुयायी
तुझी डरकाळी कानी आता पडत नाही
नुसता दिसाया दिसतो तू भीम अनुयायी
तुझी डरकाळी कानी आता पडत नाही
अंग झटकून उठ गर्जून ओ ओ ओ
अंग झटकून उठ गर्जून
का घेतोस बकरीचा सोंग का घेतोस बकरीचे सोंग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।१।।
तुझ्या अंगात आहे त्या वाघाची खाल
दे डरकाळी ऐसी आता जबडा खोल
तुझ्या अंगात आहे त्या वाघाची खाल
दे डरकाळी ऐसी आता जबडा खोल
लांब सडक घे तू झडप ओ ओ ओ
लांब सडक घे तू झडप
कर वैऱ्याची भागम भाग कर वैऱ्याची भागम भाग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।२।।
असा  पिंजऱ्यात कैदी तू होऊ नको रे
त्या सर्कस वाणी गोल फिरू नको रे
असा  पिंजऱ्यात कैदी तू होऊ नको रे
त्या सर्कस वाणी गोल फिरू नको रे
उठ वीरा तू  भीम नरा तू ओ ओ ओ ओ
उठ वीरा तू भीम नरा तु
दाखव क्रांतीची आग तू दाखव क्रांतीची आग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।३।।
तुझ्या हाती असू दे झेंडा निळा भीमाचा
लाव कपाळी आता निळा टिळा भीमाचा 
तुझ्या हाती असू दे झेंडा निळा भीमाचा
लाव कपाळी आता निळा टिळा भीमाचा
भीम विचार तू कर साकार तू ओ ओ ओ
भीम विचार तू कर साकार तू
घडी घडी सुनील सांग  तुला घडी घडी  सुनील  सांग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।४।।
लई श्रमान परिश्रमान ओ ओ ओ
लई श्रमान परिश्रमान
सुखाचा करून त्याग सुखाचा करून त्याग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग
तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या माग  ।।धृ।।




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा