सारे जयभीम जयभीम बोलू

या हो एकीने  आता डोळु
या हो एकीने  आता डोळु
सारे जयभीम जयभीम बोलू ।।धृ ।।
शिकवण हि भीमाची नेक
एकीने व्हारे एक
दृश्य पाहण्या नयन हे खोलू
दृश्य पाहण्या नयन हे खोलू 
सारे जयभीम जयभीम बोलू ।।१।।
गटबाजी हि बाजूला ठेवा
करू एकीने समाजसेवा
कार्यचक्र हे ठेवू या चालू
कार्यचक्र हे ठेवू या चालू 
सारे जयभीम जयभीम बोलू ।।२।।
भीमकार्याची कास धरा हो
भीम स्वप्न हे साकार करा हो
एकमेका हि शपथ घालू
एकमेका हि शपथ घालू
सारे जयभीम जयभीम बोलू ।।३।।
निळा झेंडा हा घेऊन हाती
हक्कासाठी करु ज्ञान क्रांती
बोल प्रथमा हे प्रेमाने बोलू
बोल प्रथमा हे प्रेमाने बोलू
सारे जयभीम जयभीम बोलू ।।४।।




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा