पिंपळाच्या पानावरती पाहिले चित्र गौतमाचे

पिंपळाच्या पानावरती पाहिले चित्र गौतमाचे
बोधी वृक्षाने कथन केले
बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। धृ  ।।
किती घोर तपश्या ती देहाचे वारूळ झाले
बुद्ध गया अजिंठा ही साक्षात वेरुल आले
किती घोर तपश्या ती देहाचे वारूळ झाले
बुद्ध गया अजिंठा ही साक्षात वेरुल आले
अष्ठगाथा मंगलमय ते पावित्र्य गौतमाचे
बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। १ ।।
या सावलीत माझ्या विश्वाची माउली ती
हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती
या सावलीत माझ्या विश्वाची माउली ती
हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती
जग जिंकूनि झाले ते मित्र गौतमाचे
बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। २ ।।
कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला
तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला
कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला
तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला
बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे
बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। ३ ।।
लिहले कुठेच नाही हा माझा धम्म आहे
निर्वाण पदांनंतर या जगी स्तूप आहे
लिहले कुठेच नाही हा माझा धम्म आहे
निर्वाण पदांनंतर या जगी स्तूप आहे
भीमदूतास कळले ते सन्मित्र गौतमाचे 
बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। ४ ।।
पिंपळाच्या पानावरती पाहिले चित्र गौतमाचे
बोधी वृक्षाने कथन केले
बोधी वृक्षाने कथन केले चारित्र्य गौतमाचे हे हे हे हे ।। धृ  ।।





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा