असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा

वाट पाहुनिया थकला जीव त्यांचा
वाट पाहुनिया थकला जीव त्यांचा
असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।। धृ ।।
पनवेल च्या नाक्यावर सोनबा तो उभा
पाहिले उतरताना गाडीतून बाबा
पाहिले उतरताना गाडीतून बाबा 
जीव तो तृषित  ऋतु उन्हाळ्याचा
असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।१।।
कोरड्या जिभेला ओलावा मिळावा
वाटले भीमाला पाणी थोडे प्यावं
वाटले भीमाला पाणी थोडे प्यावं
तरी खेद झाला दूर प्रसंगाचा
असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।२।।
धावत सोनबा घरी आला जेव्हा
गाडी भीम बाबाची निघून गेली तेव्हा
गाडी भीम बाबाची निघून गेली तेव्हा 
माठ घेऊनिया आला हो पाण्याचा
असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।३।।
प्रतीक पुन्हा येते याच वाटेवरी
माझ्या भीमबाबाची येईल ती स्वारी
माझ्या भीमबाबाची येईल ती स्वारी
डोळे भरून पाहीन वाली गरिबांचा
असा सोनबा वेडा तो भीम दर्शनाचा ।।४।।

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा