देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया

सूडबुद्धीने नाही वागले
सूडबुद्धीने नाही वागले
कर्तव्य ते कराया कर्तव्य ते कराया
देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।धृ ।।
निंदक वदले देशद्रोही केली जरी बदनामी
निंदक वदले देशद्रोही केली जरी बदनामी
भारतरत्न भीम शेवटी आले देशाच्या कामी
तारक ठरली या देशाला
तारक ठरली या देशाला संविधानाची माया संविधानाची माया
देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।१।।
दृष्टवेळ ती वाटे परंतु त्याने फुले पेरली
दृष्टवेळ ती वाटे परंतु त्याने फुले पेरली
अंधारात जनामनात ज्ञान ज्योत लावली
आपली उन्नती आपल्या हाती आपलाही उन्नती आपल्या हाती
दवडू नका रे वाया दवडू नका रे वाया
देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।२।।
भीम बळाने महिला आजची घाली गवसणी आकाशी
भीम बळाने महिला आजची घाली गवसणी आकाशी
परंपरेला धुळी मिळवले ती नाही पायाची दासी
हिंदू कोडबिल महान ठरले हिंदू कोडबिल महान ठरले
उन्नतीला साधाया उन्नतीला साधाया
देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।३।।
धर्माचा त्या अभ्यास केला कास लावून भीमानं
धर्माचा त्या अभ्यास केला कास लावून भीमानं
भारत भुला  पावन केले बुद्धाच्या धम्मान
समतेचा अन मानवतेचा समतेचा अन मानवतेचा
रचला कुंदना पाया रचला कुंदना पाया
देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।४।।
सूडबुद्धीने नाही वागले
सूडबुद्धीने नाही वागले
कर्तव्य ते कराया कर्तव्य ते कराया
देशभक्त भीमराया माझा देशभक्त भीमराया ।।धृ ।।



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा