आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला
राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।धृ।।
तू कुळाचा भिकारी आता आलिया भालदारी
त्या गाडीत माडीत आता शंकर मल्हारी
तू कुळाचा भिकारी आता आलिया भालदारी
त्या गाडीत माडीत आता शंकर मल्हारी
जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला
जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला 
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।१।।
पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जयभीम
शीळ तुकड चारल ते करतात सलाम
पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जयभीम
शीळ तुकड चारल ते करतात सलाम
तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला
तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला 
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।२।।
मोठा साहेब झालास बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास
मोठा साहेब झालास बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास
असता महाग तू वेड्या आता बिडी नि काडीला
असता महाग तू वेड्या आता बिडी नि काडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।३।।
तुला भीमानं माणूस केलं तुझ्या साठीच समवे शील
नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाने जयभीम बोल
तुला भीमानं माणूस केलं तुझ्या साठीच समवे शील
नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाने जयभीम बोल
भीम कार्यात ग्यानभाव कधी वेळ न दवडीला
भीम कार्यात ग्यानभाव कधी वेळ न दवडीला 
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।४।।






 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा