म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न
ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न 
घडविला इतिहास नवा
घडविला इतिहास नवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। धृ ।।
चार वर्णात ब्राह्माण श्रेष्ठ शुद्राने तर उपसावे कष्ट
जिद्दीने माझे भीमराव शिकले जाळला तो मनू अनिष्ट
उच्च पदवीधर जगात ठरला
उच्च पदवीधर जगात ठरला 
वैऱ्याची  गेली हवा
वैऱ्याची  गेली हवा 
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। १ ।।
भीमराव जागला बुद्धाच्या वचना केली आदर्श समाज रचना
स्त्री पुरुष सामान सारे इथे कुणी रे ते उच नीच ना
बहुजनांचा करून कायदा
बहुजनांचा करून कायदा 
झाला दीनांचा दुवा
झाला दीनांचा दुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। २ ।।
आणलं त्याने लोकांच राज भाग्य उजळलं तुझं नि माझं
शिल्पकार या संविधानाचा शोभून दिसतोय ग भीमराज
चहुमुलखीं हा झाला खरोखर
चहुमुलखीं हा झाला खरोखर 
कार्याचा गवगवा त्याच्या कार्याचा गवगवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। ३ ।।
केली तयाने नाविनवलाई झुकविली ती भटशाही
 सुखलाल लोकशाहीमुळे या हर्षदाला भीती च नाही
जन्मजन्मांचं जोडलं नातं जन्मजन्मांचं जोडलं नातं
जीव लाविला जिवा   जीव लाविला जिवा  
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। ४ ।।
ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न
ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न 
घडविला इतिहास नवा
घडविला इतिहास नवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा  ।। धृ ।।

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा